गत दोन वर्षांपासून मराठवाडा, खानदेश, विदर्भातील रक्ताच्या आजारांनी बाधित रुग्णांवर उपचार करून सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत आहे पण मनात सतत विचार येत होता अशाप्रकारे रुग्णांची संख्या का वाढत आहे… काही जणांशी चर्चा केली आणि मग ठरले कि किमान एका गावामध्ये आपण रक्त या विषयातील ‘अॅनेमिया’ व ब्लड प्रेशर या आजारांवर काम करूयात.. आणि किमान एक गाव पूर्णपणे अॅनेमिया व ब्लड प्रेशर मूक्त करण्याचा प्रयत्न करूया…काम सूरू करण्याचा प्रजासत्ताक दिनाचा दिवस ठरला.औरंगाबाद पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरजापूर (गिधाडा) गावाची या कामासाठी निवड करण्यात आली.गावातील तरूणांबरोबर या विषयात चर्चा झाली. तरुणांनी या विषयात सहकार्य करण्याचे ठरवले. आणि पहिले शिबिर २६ जानेवारी २०२० ला घेण्याचे ठरले. जीवनामृत हिमॅटॉलॉजी सेंटरचे माझे सहकारी कृष्णा कांबळे, आकाश उघडे, राहुल राठोड यांनी पूर्वतयारी केली. गावातील नवनाथ बांगर, मंगेश आघाज व अन्य तरुणांनी गावात घरोघर निरोप दिले असल्यामुळे सर्वांमध्ये शिबिरा विषयी उत्सुकता होतीच. शिबिर सुरू झाले एकूण तीनशे पन्नास पुरुष, महिला व छोट्या मुला मुलीं ची तपासणी करण्यात आली.

शिबिराची वैशिष्ट्ये

🔸 तपासणी ब्लड रिपोर्ट्स पूर्णतः निशुल्क
🔸 शिबिर पूर्णतः स्वप्रेरणा व ख़र्चाने घेन्यात आले. कुठल्याही राजकीय किंवा फ़ार्मा हस्तक्षेपा शीवाय.
🔸 शिबीर सुरू असताना रक्ताचे विविध आजार व त्यावरील उपचार यावर रुग्णांशी संवाद
🔸 रोजचा आहार व त्यावर मार्गदर्शन
🔸 शेतातील पिके व रासायनिक फवारणी यावर शेतकऱ्यांशी संवाद
पूढील ठरलेले नियोजन


👉 तपासलेल्या सर्व रुग्णांचे रिपोर्ट येत्या आठ दिवसात सर्वांपर्यंत पोहोचवणे
👉 रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी गावकऱ्यांबरोबर झालेल्या तपासणी विषयी चर्चा व ब्लड प्रेशर तपासणी शिबिर
👉 ॲनिमिया ग्रस्त रुग्णांवर येणाऱ्या काळात निशुल्क उपचार
👉 औषधा पेक्षा दैनंदिन जिवनात व आहारात बदल करुण उपचार करण्यावर भर
👉 दर महा ग्राम विकास समितीच्या कार्यकर्त्यांबरोबर आहारातील बदल याविषयी चर्चा
👉आपण केलेल्या प्रयत्नांचा परिणाम काय झाला हे तपासण्यासाठी पुन्हा 15 ऑगस्ट 2020 रोजी पुनर्रतपासणी शिबिर
ध्येय
🤏 गिरजापुर (गिधडा) गावातील ॲनिमिया व ब्लड प्रेशर च्या रूग्णांची संख्या 0% करणे

आपण संपूर्ण देश निरोगी करू शकत नाही परंतु किमान एक गाव निरोगी करू शकतो आणि त्यासाठी सुरू केलेला हा एक छोटासा प्रयत्न व संकल्प…

आजच्या या शिबिरामध्ये माझे सहकारी डॉ.सौ.श्वेता तोष्णीवाल डॉ. ममता डव्हळे, जीवन अमृत हिमॅटॉलॉजी सेंटरचे जनसंपर्क अधिकारी सागर वडगावकर, माझे सहकारी श्री.कल्पेश जाधव यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *