“Consultant Haematologist ”, Haemato-Oncologist & Bone Marrow Transplant Physician

PROFESSIONAL QUALIFICATION

 • DM (Clinical Haematology), Seth GSMC and KEM Hospital, MUHS Maharashtra, India. ( GOLD MEDAL)
 • Fellowship in Bone Marrow Transplant, TATA Memorial Hospital, Mumbai.
 • Fellowship in Leukaemia and Bone Marrow Transplant, British Columbia Cancer Agency, Vancouver, Canada.
 • MD (Internal Medicine), Government Medical College Aurangabad, MUHS Maharashtra India
 • M.B.B.S, Government Medical College Aurangabad, MUHS Maharashtra, India

Only haematologist in the country to have two fellowships in Bone Marrow Transplant

 

PUBLICATIONS/PAPERS/POSTERS- Click Here


 

डॉ. मनोज तोष्णीवाल, रक्तविकार तज्ञ व बोनमॅरो तज्ञ, हे मुळचे जालना जिल्ह्यातील मंठा या छोट्या गावचे. त्यांनी गेल्या नऊ वर्षांत तब्बल ५००० पेक्षा जास्त कँसरच्या रुग्णांवर उपचार केले आहेत.

डॉ. तोष्णीवाल यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), औरंगाबाद येथून प्रथम एम.बी.बी.एस. आणि त्यानंतर येथूनच एम.डी. मेडिसिन ही पदवीही पहिल्याच प्रयत्नात प्राप्त केली. एम.डी. पूर्णकरून औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एक वर्ष सेवा दिली. नंतर ते डी.एम. हिमॅटोलॉजीचे (रक्तविकार) शिक्षण घेण्यासाठी सुप्रसिद्ध सेठ जी एस मेडिकल कॉलेज अँड केईएम हॉस्पिटल येथे गेले. डी.एम. साठी सर्व शाखा उपलब्ध असूनही विषयाची आवड आणि मराठवाड्यातील ब्लडकँसरच्या रुग्णांना सेवा देण्याची इच्छा यांतून त्यांनी हिमॅटोलॉजी या विषयाची निवड केली व त्यात गॉल्ड मॅडल घेऊन विशेष प्राविण्यासह यश मिळवले.

येथेही ते थांबले नाहीत. रुग्णांना आपल्याकडून अत्यंत उच्च दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी त्यांनी बोनमॅरो ट्रान्सप्लांट या विषयातही उच्चशिक्षण घेण्याचे ठरवले आणि त्यासाठी कँसरवरील उपचारासाठी जगप्रसिद्ध असे मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल गाठले. टाटामध्ये असतांना उच्च प्रतीचे शिक्षण तर मिळालेच परंतु त्याचबरोबर त्यांनी देशभरातील रुग्णांवर उपचार करण्याचा अनुभवही घेतला.

आज कँसर या विषयावर जगभरात संशोधन सुरु असून नवनवीन उपचार पद्धतींचा वापर होत आहे. आपल्या रुग्णांनाही या सेवा देता याव्यात या जाणीवेने प्रेरित होऊन डॉ. तोष्णीवाल यांनी बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी जगप्रसिद्ध अशा ‘ब्रिटीश कोलंबिया कँसर एजन्सी’ येथे जाऊन विशेष प्रशिक्षणही घेतले.

उपरोक्त कारकिर्दीत त्यांना अनेक संस्थांकडून गौरविण्यात आले. मोठमोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रुग्णालयांत संधी उपलब्ध असतांनादेखील आपल्या जन्मभूमीला आपली गरज आहे हे ओळखून आणि मराठवाडा तसेच आसपासच्या गरजू रुग्णांना अत्याधुनिक सेवा पुरविण्याचे ध्येय उराशी बाळगून ते औरंगाबाद येथे स्थायिक झाले.

डॉ. मनोज तोष्णीवाल यांना वैद्यकीय शिक्षणाची व वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनांविषयी अद्ययावत राहण्याची आवड आहे. शिवाय, हे ज्ञान फक्त आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही ते सतत प्रयत्नशील असतात.

समाजातल्या गोरगरिबांना आधुनिक उपचारांपासून वंचित राहावे लागू नये व आपल्या ज्ञानाचा उपयोग पुढच्या पिढीलाही व्हावा या हेतूने ते औरंगाबादमधील एम.जी.एम. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या सेवा देत आहेत. शहरातील इतर नामांकित रुग्णालयांतही ते एक सुप्रसिद्ध ब्लडकँसर तज्ञ म्हणून ओळखले जातात.

डॉ. तोष्णीवाल यांनी औरंगाबादला प्रथमच रक्तविकारांवरील परिपूर्ण उपचार उपलब्ध करून दिले आहेत. ज्यात,

 • रक्तक्षय (अनिमिया)
 • सिकलिंग, थॅलसिमिया
 • प्लेटलेट्सची कमतरता (आय.टी.पी.)
 • एप्लास्टिक अनिमिया
 • अतिरिक्त रक्तस्रावाचा आजार (हिमोफिलिया)
 • सर्वप्रकारचे ब्लडकँसर –ल्युकेमिया, लिम्फोमा, मायलोमा
 • अनिमिया प्रोफाईल
 • सर्व प्रकारच्या केमोथेरपी सवलतीच्या दरात
 • सिकलसेल आणि इतर आजारांसाठी एक्स्चेंज ट्रान्सफ्युजन
 • बोनमॅरोची विश्वसनीय तपासणी तसेच त्वरित रिपोर्टिंग
 • पोलीसिथेमिया, एमडीएस आणि रक्तासंबंधी सर्व आजारांवर तपासणी तसेच उपचार यांचा समावेश आहे.